बीड जिल्ह्यातील शनिवारचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.19 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 4579 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 173 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4406 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्येत किंचित वाढ दिसुन येत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)

अशी आहे तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-30, अंबाजोगाई-11, आष्टी-41, धारुर-12, गेवराई-13, केज-18, माजलगाव-11, परळी-4, पाटोदा-13, शिरुर-17, वडवणी-3 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत गेल्या काही दिवसात किंचित वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे चिंतेत भर पढत आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीत पॉझिटीव्हीटी रेट वाढल्याचे जाहिर करत नागरिकांना पुन्हा नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान,  राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ओघ कमी होत चालला आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 9 हजार 798 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 14 हजार 347 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 198 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 56,99,983 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 95.73 टक्के एवढे झाले आहे.

तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.96 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,90,78’541 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,54,508 (15.24 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,54,461 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,831 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!