बीड जिल्ह्यात कोरोनाचे २४ बळी; ५३३ पॉझिटीव्ह रुग्ण

बीडः बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या २४ नोंदवली गेली असुन एकुण पॉझिटीव्ह रुग्ण संख्या ५३३ झाली आहे.
सुरुवातीच्या काळात निरंक राहिलेला बीड जिल्हा आज मात्र पाचशेची संख्या ओलांडून हजाराकडे मार्गक्रमण करत आहे. आज प्रशासनाकडून प्रसिध्द केलेल्या आकडेवारीत जिल्ह्यात आत्तापर्यंत ५३३ पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यात १६ रुग्ण जिल्ह्याच्या बाहेर आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील २४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर झाली आहे. यातील ४ रुग्ण जिल्ह्याच्या बाहेर मृत पावली आहेत. जिल्ह्यात सध्या २४९ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर २७४ रुग्ण उपचारानंतर बरी झाली आहेत. उपचार घेत असलेल्या एकुण रुग्णापैकी ६ रुग्ण गंभीर, ५ मध्यम तर २३८ रुग्ण सौम्य स्वरुपाची आहेत. जिल्ह्यात सध्या १३५ कंटेंनमेंट झोन आहेत. अशा स्वरुपाची माहिती जिल्हा प्रशासनाकडून आज जाहीर करण्यात आली आहे.