मंगळवार … बीड जिल्ह्यातील कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.22 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 2917 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 147 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2770 जण निगेटिव्ह आली आहेत. वाढत असलेल्या संख्येमुळे गेल्या काही दिवसात चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. यात समाधानकारक अहवाल येत आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)

अशी आहे तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-31, अंबाजोगाई-12, आष्टी-29, धारुर-6, गेवराई-13, केज-11, माजलगाव-7, परळी-3, पाटोदा-14, शिरुर-15, वडवणी-6 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत पुन्हा ब्रेक लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात काल ICMR कडून सीरो सर्वेक्षण करण्यात आले. वेगवेगळ्या ठिकाणाहून 500 जणांचे रक्त नमुने घेण्यात आले. लवकरच याचा अहवाल राज्य सरकारकडे मिळणार आहे.

राज्याला मोठा दिलासा.
दरम्यान, राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे. आजही (21 जून) राज्यात रविवारच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत घट झाली असून आज दिवसभरात कोरोनाचे 6,270 नवे रुग्ण आढळले आहेत. काल राज्यात 9361 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली होती.

तर एकूण 94 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील कित्येक महिन्यानंतर मृतांचा आकडा हा शंभरच्या खाली आला आहे. रुग्णसंख्या घटल्यामुळे मृतांचा आकडाही कमी होताना दिसत असून हे दिलासादायक चित्र असल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. आज दिवसभरात 13,758 जण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात 1,24,398 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत एकूण 1,18,313 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!