बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; आज बाधित वाढले.

बीड दि.21 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1269 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 22 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1247 जण निगेटिव्ह आली आहेत. कोरोना रुग्ण संख्येत घट आढळून असताना आज पुन्हा संख्या 6 वरुन 22 वर आली आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-3, आष्टी-5, धारुर-1, गेवराई-4, केज-0, माजलगाव-2, परळी-1, पाटोदा-4, शिरुर-0, वडवणी-1 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना (Corona) काल संख्येत मोठी घट दिसून आली होती. आज यात पुन्हा वाढ झाली आहे. काल मृत्यूच्या संख्येत 2 ने वाढ झाली. तर 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या 2799 झाली आहे. आज पर्यंतच्या नोंदी नुसार जिल्ह्यात एकुण 151 ॲक्टीव रुग्ण आहेत. आज 2 तालुक्यात बाधितांची संख्या शुन्य आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या कमी झाली असून, आज (बुधवारी) 1 हजार 825 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 2 हजार 879 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रूग्णांची संख्या 65 लाख 96 हजार 945 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 27 हजार 426 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.45 टक्के एवढा झाला आहे.