बीड जिल्हा कोरोना अपडेट… पहा तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी.

बीड दि.14 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 727 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 23 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 704 जण निगेटिव्ह आले आहेत.
( Today’s Corona Update in Beed District; See what the status is. )
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-2, अंबाजोगाई-3, आष्टी-12, धारुर-0, गेवराई-1, केज-1, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-3, शिरुर-0, वडवणी-1 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या 23 असून संशयितांच्या तपासण्या केवळ 727 आहेत. आज केवळ 7 तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. गेल्या तीन दिवसात चार दिवसांपासून बाधितांचा आकडा 30 च्या खाली आहे. गुरुवारी 29, शुक्रवारी 27 शनिवारी 21 तर रविवारी 27 बाधित आढळले होते.
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या रविवारच्या नोंदीनूसार 55 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2863 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 206 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 2.38 टक्के, रिकव्हरी रेट 97.16 तर डेथ रेट 2.64 आहे.
दरम्यान, राज्यात तीन दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीचा आलेख घसरता दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी 3 हजार 502 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 9 हजार 815 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात सध्या 45 हजार 905 ॲक्टिव रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 76,49,669 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.54 टक्के एवढे झाले आहे.
राज्यात 218 नवीन ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांची भर पडली आहे. आज आढलेल्या एकूण रुग्णांपैकी मुंबई 172, पुणे मनपामध्ये 30, गडचिरोलीमध्ये 12 आणि पुणे ग्रामीणमध्ये चार रुग्णांची नोंद झाली आहे.