बीड जिल्हा कोरोना अपडेट… पहा मंगळवारची तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.15 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 739 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 18 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 721 जण निगेटिव्ह आले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-4, आष्टी-5, धारुर-1, गेवराई-0, केज-1, माजलगाव-1, परळी-1, पाटोदा-2, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या 18 असून संशयितांच्या तपासण्या केवळ 739 आहे. आज 8 तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. गेल्या दोन दिवसात बाधितांचा आकडा 25 च्या खाली आहे.
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या सोमवारच्या नोंदीनूसार 38 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यू एकाने वाढ होवून जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2864 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 190 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 3.16 टक्के, रिकव्हरी रेट 97.18 तर डेथ रेट 2.64 आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना नियंत्रणात आला असून गेल्या चोवीस तासात केवळ दोन हजार रुग्ण सापडले आहेत. तर बारा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णही 36 हजारच्या आसपास असून हा आकडा गेल्या आठ दिवसात 30 ते 35 हजाराने खाली आला आहे.
सोमवारी 1 हजार 966 रुग्ण आढळले आहेत, पैकी 12 जण दगावले. 11 हजार 408 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 97:66 टक्के आहेत. आजपर्यंत 7 कोटी 65 लाख 27 हजार 895 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.25 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 44 हजार 915 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात 3 लाख 48 हजार 408 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 815 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 36 हजार 447 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रॉनचे 8 रुग्ण – कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमयक्रॉन राज्यात हळू हळू फैलावत आहे. शनिवारी 237 रुग्णांपैकी 226 रुग्ण मुंबईत सापडले होते. आज आठ रुग्णांचे निदान झाले आहे. सर्वच रुग्ण मुंबईतील आहेत. आजपर्यंत 3 हजार 768 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत.