बीड जिल्हा कोरोना अपडेट… दिलासादायक शुक्रवार, तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.18 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1068 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी केवळ 6 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1062 जण निगेटिव्ह आले आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-0, आष्टी-2, धारुर-1, गेवराई-2, केज-0, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या केवळ 6 असून संशयितांच्या तपासण्या 1068 आहे. आज फक्त 4 तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. चालू आठवड्यात जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या गुरुवारच्या नोंदीनूसार 23 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2868 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 155 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 1.82 टक्के, रिकव्हरी रेट 97.20 तर डेथ रेट 2.64 आहे.

दरम्यान, राज्यात ( Maharashtra corona update ) कोरोनाची रुग्णसंख्या आज स्थिर स्थावर आहे. सुमारे 2 हजार 797 जणांना संसर्गाची बाधा झाली असून 40 जण दगावले आहेत. तर, सक्रिय रुग्ण 23 हजार इतके असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.83 टक्के आहे.

ओमयक्रोनचा ( Omicron ) मात्र गुरुवारी एकही रुग्ण आढळला नसल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेले ओमयक्रोनचे बुधवारी 111 तर, मंगळवारी 351 रुग्ण सापडले होते. मात्र, गुरुवारी एकही रुग्ण न सापडल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे.

आजपर्यंत 4 हजार 456 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर, 3 हजार 355 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 8 हजार 904 जणांची जनुकीय चाचणी केली. 7 हजार 991 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून, 913 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!