कोरोंना विशेष

सावधान… कोरोना व्हायरस हवेतूनही पसरू शकतो!

जागतिक आरोग्य संघटनेचा दुजोरा

कोविड-19 अपडेट

कोरोना संक्रमित व्यक्तीच्या शिंकेतून, श्वासातून, खोकण्यातून उडणाऱ्या तुषारातून पसरतो असं मानलं जात होतं. मात्र कोरोनाचा विषाणू हवेतूनही पसरत असल्याच्या वृत्ताला जागतिक आरोग्य संघटनेने दुजोरा दिला आहे.

सध्या प्रशासन सामान्य जनतेने आरोग्याची काळजी घेण्या संदर्भात अनेक सुचना करत आहे. मात्र याला प्रतिसाद न देता अनेक जन मास्क शिवाय बाहेर पडत असल्याचे दिसुन येत आहेत. कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याच्या वृत्तामुळे आता सावधानता बाळगणे गरजेचे झाले आहे.

वैज्ञानिकांच्या एका गटाने यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहून कोरोना कसा पसरतो याबाबत बदल करण्याचं सुचवलं होतं. कोरोना हवेतूनही संक्रमित होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेत कोव्हिड-19 संदर्भात टेक्निकल लीड म्हणून कार्यरत डॉक्टर मारिया वा केरखोव यांनी सांगितलं. कोरोनाव्हायरस हा हवेतूनही पसरू शकतो, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं असल्याने आता चिंता अधिक वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!