आज २८ स्वॅब अहवालाची प्रतिक्षा; तालुक्याचा आकडा ७०

किल्लेधारूर दि.१६(वार्ताहर) काल २८ लोकांचे थ्रोट स्वॅब येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असुन आज रात्री त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे. धारुर तालुक्यात आजपर्यंत ७० रुग्णांची नोंद झाली असून यात बाहेर जिल्ह्यात असलेल्या चौघांचा समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.
शहरात गेल्या सोळा दिवसांपासून दररोज पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत. काही प्रमाणात ग्रामीण भागातही पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत. घागरवाडा, गोपाळपुर, उमरेवाडीतही रुग्ण आढळून आली. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत २८ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. या स्वॅबचे अहवाल आज रात्री प्राप्त होणार आहेत. धारुर तालुक्यात आजपर्यंत ७० रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या उपचार घेत असलेले ३७ तर उपचार घेवून परतलेल्या रुग्णांची संख्या २९ आहे. उपचार घेत असलेल्या ३६ पैकी धारुर विलगीकरण कक्षात काल आढळून आलेल्या सह २७ जन उपचार घेत आहेत. तालुक्यातील तीन रुग्ण औरंगाबाद, एक बीड तर एक लातूर येथे उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.