बीड कोरोना अपडेट; शुक्रवारी चार मृत्यूनंतर शनिवारी बाधितांत वाढ.. पहा तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी.

बीड दि.27 नोव्हेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 782 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 12 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 770 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सहा तालुक्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. दरम्यान काल आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार गेल्या 24 तासात कोरोनावर उपचार घेत असलेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-1, आष्टी-6, धारुर-0, गेवराई-0, केज-1, माजलगाव-0, परळी-2, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज वाढ होवून दहा पेक्षा अधिक झाली आहे. गुरुवारी 9 तर शुक्रवारी 4 असलेली बाधितांची संख्या आज 12 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार गुरुवारी 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी 4 मृत्यूची नोंद झाली. मृत्यूची एकुण संख्या 2823 वरुन 2827 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 70 आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शुक्रवारी 852 नव्या कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली असून, 665 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दहा हजारांच्या खाली आली असून, सध्याच्या घडीला 8 हजार 106 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 32 हजार 723 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 80 हजार 061 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.70 टक्के झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!