बीड जिल्ह्यात 24 तासात 4 मृत्यू; शुक्रवारी काय आहे कोरोना स्थिती.

बीड दि.15 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1690 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 18 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1672 जण निगेटिव्ह आली आहेत. आज पुन्हा 3 कोरोना बळींची भर पडली आहे तर मागील 24 तासात 4 बळी नोंदवण्यात आली आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-6, अंबाजोगाई-2, आष्टी-2, धारुर-1, गेवराई-2, केज-0, माजलगाव-2, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-3 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आटोक्यात आली आहे. गुरुवारी 18 तर आज 19 कोरोना बाधितांची सुट्टी करण्यात आली. गुरुवारी एक तर आज शुक्रवारी 3 कोरोना बळीची नोंद झाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या 2792 झाली आहे. आज जिल्ह्यात एकुण 194 ॲक्टीव रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात गुरुवारी 2,384 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 343 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 13 हजार 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे.

राज्यात 35 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 296 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 29 हजार 560 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,26,249 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,070 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 06,83, 280 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!