बीड कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.17 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1213 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 8 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1205 जण निगेटिव्ह आहेत. आज चार तालुक्यात रुग्ण आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-2, आष्टी-2, धारुर-0, गेवराई-0, केज-3, माजलगाव-0, परळी-1, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत दिवसेंदिवस घट दिसत असताना आज किंचित वाढ दिसून आली. आज 4 तालुक्यात 8 रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी (दि.16) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 10 होती. जिल्ह्यात दोन मृत्यूची वाढ होवून एकुण मृत्यू संख्या 2838 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 58 झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात आज दिवसभरात 877 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे, 19 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात 632 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आत्तापर्यंत महाराष्ट्रात 64 लाख 95 हजार 249 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.72 टक्के झाला आहे. आज राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एकाही रूग्णाची नोंद झालेली नाही. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 73 लाख 6 हजार 860 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 46 हजार 938 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 77 हजार 371 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 839 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.