बीड कोरोना अपडेट; आज वाढ… पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.18 डिसेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1190 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 10 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1180 जण निगेटिव्ह आहेत. आज सहा तालुक्यात रुग्ण आढळले आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-4, अंबाजोगाई-1, आष्टी-2, धारुर-0, गेवराई-0, केज-0, माजलगाव-1, परळी-1, पाटोदा-0, शिरुर-1, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत दिवसेंदिवस घट दिसत असताना आज दुसऱ्या दिवशीही किंचित वाढ दिसून आली. आज 6 तालुक्यात 10 रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी (दि.17) आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 20 होती. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2838 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 46 झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शुक्रवारी 902 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 680 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय.

राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 95 हजार 929 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71% इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12% एवढा झाला आहे. राज्यात आज ओमायक्रॉनच्या आठ रुग्णांचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 40 इतकी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!