बीड कोरोना अपडेट… केजमध्ये बाधित वाढले; पहा तालुकानिहाय स्थिती….

बीड दि.5 जानेवारी – जिल्ह्यात दिलासादायक चित्र असताना आज पुन्हा रुग्ण संख्या वाढली आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे 1301 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 12 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1289 जण निगेटिव्ह आहेत. आज 3 तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज पुन्हा ओमायक्रॉनसह कोरानाचा विस्फोट झाला आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-0, अंबाजोगाई-2, आष्टी-0, धारुर-0, गेवराई-0, केज-6, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-4, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत गेल्या दोन दिवसात मोठी वाढ झाली आहे. काल मंगळवारी (दि.4) 10 कोरोना बाधित आढळून आले होते. यात आज दोनने वाढ झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 0 होती. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2841 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 49 झाली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी भर पडत असल्याने प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली असून आज राज्यात 18,466 नव्या कोरोना बाधितांची (Corona Positive) नोंद करण्यात आली आहे. तर, 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 4558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

सध्या राज्यात 66,308 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यातील बाधितांची संख्या देखील वाढत असून ही आकडेवारी आता 653 वर गेली असून यातील 259 जणांनी ओमिक्रॉनवर (Omicron) मात यशस्वी मात केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!