बीड कोरोना अपडेट… जिल्ह्यात तपासण्या वाढल्या; पहा तालुकानिहाय स्थिती….

बीड दि.6 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2157 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 12 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 2145 जण निगेटिव्ह आहेत. आज 5 तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. तर आज राज्यासह देशात कोरानाचा विस्फोट झाला आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-5, अंबाजोगाई-0, आष्टी-2, धारुर-0, गेवराई-1, केज-0, माजलगाव-0, परळी-3, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत सलग तिसऱ्या दिवशीही मोठी वाढ झाली आहे. काल बुधवारी (दि.5) 12 कोरोना बाधित आढळून आले होते ते आजही कायम आहे. मात्र काल पेक्षा आज संशयितांच्या तपासणी वाढल्या आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या नोंदीनूसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 होती. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2841 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 57 झाली आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना बधितांचा आकडा 26 हजारपर्यंत पोहोचला आहे. तर ओमायक्रॉनचे 100 नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 5538 रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
दिवसभरात 8 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून मृत्यूदर घटून 2.9 टक्के इतका आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 97 लाख 77 हजार 007 चाचण्या केल्या. या चाचण्यांपैकी 09.68 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 14 हजार 758 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 1366 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहे. 85 हजार 505 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.