बीड जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी वाढतीच; अंबाजोगाई, बीड, आष्टी व केजची चिंताजनक स्थिती.

बीड दि.20 एप्रिल- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 4108 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1024 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3084 जण निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, जिल्हाभर कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी नवनवीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
(Corona figures continue to rise in Beed district; Anxious condition of Ambajogai, Beed, Ashti and Kaij.)
आज चौरेचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 206 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज सर्वाधिक अंबाजोगाई तालुक्यात 231, आष्टी तालुक्यात 111 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 50 तर केजमध्ये 122 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-206, अंबाजोगाई-231, आष्टी-111, धारुर-50, गेवराई-45, केज-122, माजलगाव-50, परळी-101, पाटोदा-47, शिरुर-46, वडवणी-15 अशी आहे.
कोविड-19 (covid-19) चा जिल्ह्यात उद्रेक वाढला आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढतच आहे. आज राज्य सरकारने नवीन आदेशाद्वारे अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने, फळ व भाजी विक्रेते, मटन चिकन व बेकरीच्या दुकांनाना सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासांत 58 हजार 924 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळले असून 351 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधितांची संख्या 38 लाख 98 हजार 262 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 60 हजार 824 जणांचा मृत्यू झाला आहे. तसचे आज दिवसभरात 52 हजार 412 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 31 लाख 59 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.