बीड जिल्ह्यात 3 दिवसांत 5 कोरोना बळी, 64 मुक्त; पहा आजचे कोरोना अपडेट.

बीड दि.19 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1221 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 27 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1194 जण निगेटिव्ह आली आहेत. दोन दिवसांनतर आज कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ आढळून आली.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-5, आष्टी-5, धारुर-0, गेवराई-2, केज-2, माजलगाव-3, परळी-1, पाटोदा-5, शिरुर-1, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना (Corona) हद्दपार होत असल्याचे चित्र दिसत असताना आज अचानक संख्येत मोठी वाढ दिसून आली. दि.16 रोजी 8, सोमवारी 10 तर आज मंगळवार (दि.19) रोजी 27 नवीन बाधित आढळली. मृत्यूच्या संख्येत तीन दिवसांत 5 ने वाढ झाली. तर तीन दिवसांत 64 कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या 2792 वरुन 2797 झाली आहे. रविवारी 1, सोमवारी 1 तर मंगळवारी 3 रुग्णांचा मृत्यू झाला. आज पर्यंतच्या नोंदी नुसार जिल्ह्यात एकुण 162 ॲक्टीव रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात राज्यात मंगळवारी 1 हजार 485 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 2 हजार 078 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आतापर्यंत 64 लाख 93 लाख 182 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.4 टक्के आहे. तसेच 27 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 39 हजार 816 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!