बीड जिल्ह्यात आजही बाधितांची संख्या वाढली… पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.26 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2371 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 295 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 2076 जण निगेटिव्ह आहेत. सर्व तालुक्यात रुग्ण आढळून आले आहेत. संशयितांच्या तपासणी संख्या वाढली आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-38, अंबाजोगाई-76, आष्टी-25, धारुर-3, गेवराई-17, केज-25, माजलगाव-43, परळी-52, पाटोदा-1, शिरुर-5, वडवणी-10 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत कालपेक्षा आज पुन्हा वाढ झाली आहे. आज अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक 76 रुग्ण तर परळी तालुक्यात 52 रुग्ण आढळले आहेत. या खालोखाल माजलगाव तालुक्यात 43 रुग्ण आढळले आहेत.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या मंगळवारच्या नोंदीनूसार 106 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2847 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 1737 झाली आहे. एका आठवड्यात जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट काल कमी होवून 11.12 झाला आहे.

दरम्यान, राज्यात मंगळवारी राज्यात 33 हजार 914 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 86 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 30 हजार 500 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 75 लाख 69 हजार 425 वर गेलीय तर आतापर्यंत 71 लाख 20 हजार 436 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 1 लाख 42 हजार 237 जणांच्या मृत्यूंची नोंद झालीय.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!