बीड जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट; केज द्विशतक तर धारुर 67, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.1 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4599 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1512 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3087 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s Corona Update of Beed District; Kaij double century while Dharur 67, see taluka wise statistics.)

आज सत्तेचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 277 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 271, आष्टी तालुक्यात 180 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 67 तर केजमध्ये 216 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-277, अंबाजोगाई-271, आष्टी-180, धारुर-67, गेवराई-120, केज-216, माजलगाव-32, परळी-141, पाटोदा-67, शिरुर-99, वडवणी-42 अशी आहे.

कोविड-19 (covid-19) च्या विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक अख्ख्या देशभर वाढलेला आहे. राज्यापाठोपाठ बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. येत्या दोन तीन दिवसात देशात कोरोना नव्या संख्येचा उच्चांक गाठणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कालच्या दिवसात (30 एप्रिल 2021) 62,919 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांचे निदान झाले. तर राज्यात 828 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.5% एवढा आहे. राज्यात सध्या 6,62,640 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 46,02,472 झाली आहे. विशेष म्हणजे राज्यात काल 69,710 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात एकूण 38,68,976 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 84.06 % एवढे झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!