बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट; धारुर 68 तर केज 121, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.14 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4783 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1112 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3671 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s number of Beed district; Dharur 68 and Kaij 121, see taluka wise statistics.)

आज साठाव्या दिवशी बीड तालुक्यात 238 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 119, आष्टी तालुक्यात 129 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 68 तर केजमध्ये 121 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-238, अंबाजोगाई-119, आष्टी-129, धारुर-68, गेवराई-111, केज-121, माजलगाव-91, परळी-54, पाटोदा-98, शिरुर-66, वडवणी-17 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या बाराशेवर स्थिर आहे. दररोज येणारी आकडेवारी पेक्षा आता बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला ब्रेक देत 45 पेक्षा जास्त वयोगटातील दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरु ठेण्यात आले आहे. आज शिथिलता संपूनही बाजारात प्रचंड गर्दी दिसुन आली. फळ, भाजी विक्रेत्यांमुळे गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण आढळले. पण दिलासादायक वृत्त म्हणजे सर्वाधीक रुग्ण बरे होऊण घरी गेले आहेत. ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांनी करोनावर मात केली. तर ४००० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात करोनाची लागण होण्याचे प्रमाण दोन कोटींच्या पुढे गेले आहे. तर करोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!