उर्जा मंत्री नितिन राऊत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा….मनसे

किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर) कोरोना (corona) काळात राज्यात विजवितरण कंपनीने मीटरची पाहणी न करता गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात वाढीव बिले पाठविली व त्याची वसुलीही केली. अशा प्रकारे विजवितरण कंपनीने वाढीव बिले पाठवून जनतेची फसवणूक केली आहे. त्यात उर्जा मंत्री नितिन राऊत (Nitin Raut) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन धारुर तालुका महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या (MNS) वतीने तालुका अध्यक्ष विठ्ठल शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली धारुर पोलिस (Police) ठाण्यात देण्यात आले.

कोरोना (corona) काळात शहरी तसेच ग्रामीण भागातही मीटरची पाहणी न करता ग्राहकांना विजबिले (Light Bill) देण्यात आली होती. त्यामुळे वापरापेक्षा कितीतरी अधिक बिले ग्राहकांना आली. त्याचा ग्राहकांना मोठा भुर्दंड बसला होता. त्यावेळी ग्रामीण व शहरी भागातूनही विजवितरण कंपनीच्या विरोधात वाढीव बिलाबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र ग्राहकांना आता तुम्ही बिले भरल्यानंतर ती कमी करून दिली जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन पाळले गेले नाही. याचा निषेध करत मनसेच्या (MNS) वतीने ज्या ग्राहकांना अधिक वाढीव बिले आली ती कमी करावीत व या पुढील काळात येणाऱ्या बिलातून ती वजा करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. या वेळी तालुका अध्यक्ष विठ्ठल शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस (Police) ठाण्यात जनतेची वाढीव लाईटबिल (Light Bill) पाठवून फसवणूक केली असल्यामुळे उर्जा मंत्री नितिन राऊत (Nitin Raut) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांना देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष भारतराव ईखे, विद्यार्थी आघाडी तालुका प्रमुख प्रशांत शिनगारे, सारंग खिंडरे, अजित शिनगारे, विजयसिंह दिख्खत, वैजेनाथ देशमुख, राहुल बोराडे, निलेश शिनगारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!