कोरोंना विशेष

बीड जिल्ह्याची आजची संख्या चिंताजनक… धारुरमध्ये आढळले रुग्ण …अशी आहे तालुका निहाय आकडेवारी…

बीडः-3 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 1045 प्राप्त अहवाला पैकी फक्त 80 जनांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 965 जन निगेटिव्ह आली आहेत आज सर्वाधिक 37 कोरोना रुग्ण बीड तालुक्यात आढळले. धारुर शहरात 1 तर तालुक्यात 3 रुग्ण आढळले आहेत. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

(Today’s number of Beed district is alarming … Patients found in Dharur … Such are the taluka wise statistics …)

1. बीड- 37              7.माजलगाव-5
2. अंबाजोगाई-15     8.परळी-2
3. आष्टी-8               9.पाटोदा-6
4. धारुर-3            10.शिरुर-1
5. गेवराई-2          11.वडवणी-1
6. केज-2

वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.3 बुधवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात व्यापाऱ्यांची अँटीजन चाचणी तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या आढळून येत असल्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना (corona) संशयितांच्या चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे.

दरम्यान, आज बीड जिल्ह्यात अलिकडच्या काळातील सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याची नोंद झाली आहे. व्यापाऱ्यांची अँटीजन चाचणीकडे फिरवलेली पाठ चिंतेची ठरत आहे. आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून ठिकठिकाणी व्यापाऱ्यांच्या बैठका घेवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!