मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात कोरोना विस्फोट? आठ जिल्ह्यांची काय आहे परिस्थिती?

औरंगाबाद दि. 11 एप्रिल – सध्या राज्यात कोरोना (Corona) उद्रेक उद्भवला आहे. मार्च महिन्यात सुरुवातीला विदर्भ व नंतर मराठवाड्यात (Marathwada) कोरोना प्रादुर्भाव वाढल्याचे दिसुन आले. देशातील टॉप 10 जिल्ह्यात मराठवाड्यातील औरंगाबाद व नांदेडचा समावेश होता. आजही मराठवाड्यातील काही जिल्ह्यात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती दिसुन येत आहे. शनिवारी मराठवाड्यातील (Marathwada) आठ जिल्ह्यांत 6 हजार 656 कोरोना बाधित (Corona Positive) आढळून आली आहेत. तर 83 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

(Corona eruption in which district of Marathwada? What is the situation in eight districts?)

जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
1. औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी 1964 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 97412 झाली आहे. तर दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू झाला.
2. नांदेड जिल्ह्यात 1 हजार 759 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

3. हिंगोली जिल्ह्यात नवीन 111 रुग्ण आढळून आले. दिवसभरात 301 रुग्णांना सुटी देण्यात आली.
4. परभणी जिल्ह्यात 684 कोरोना बाधित (Corona Positive) आढळले. त्याचबरोबर दिवसभरात 379 रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

5. जालना जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 652 नवीन रुग्ण निष्पन्न झाले आहेत. तर दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 597 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 31 हजार 855 कोरोना बाधितांपैकी 25 हजार 208 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात तब्बल 6 हजार 85 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 562 जणांचा मृत्यू झाला आहे.

6. लातूर जिल्ह्यात 1 हजार 486 रुग्णांची भर पडली. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी बरे होवून सुट्टी मिळालेले 582 रुग्ण आहेत. एकुण मयतांचा आकडा 804, तर सध्या उपचार घेत असलेले 9204 रुग्ण संख्या आहे.

7. बीड जिल्ह्यात 764 रुग्णांची भर पडली तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 31 हजार 278 झाली आहे. पैकी 27 हजार 271 जण कोरोनामुक्त झाले असून 698 जणांचा मृत्यू झाला आहे.
8.उस्मानाबाद जिल्ह्यात 558 नवीन रुग्ण आढळले तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

नादेंडमध्ये शासकीय रुग्णालय फुल्ल.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशातच अनेक जिल्ह्यांमध्येही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयं कोरोना रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. तसेच रुग्णालयातील ऑक्सिजन काही तासांत संपणार असल्याची धक्कादायक माहिती डॉ. शंकराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एस.चव्हाण यांनी माध्यमांना दिली आहे. शासकीय मेडिकल कॉलेज येथे रुग्णांना अक्षरशः परत पाठवलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!