आज सर्वाधिक बाधित केज तालुक्यात; पहा बीड जिल्ह्यातील तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.21 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2273 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 41 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2232 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी बाधितांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-9, अंबाजोगाई-4, आष्टी-3, धारुर-0, गेवराई-5, केज-14, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-4, शिरुर-1, वडवणी-1 अशी आहे.

बीड जिल्ह्यात सण, उत्सवाचा काळ कोरोना प्रादुर्भाव वाढण्यासाठी कारणीभूत ठरु शकतो अशी शक्यता वर्तवली जात असताना मात्र कोरोनाचा आकडा कमी झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. गणेश विसर्जनामुळे काल केवळ 1418 संशयित रुग्णांची कोरोना अहवाल होते ते आज वाढ होवून 2273 झाली.

दरम्यान, राज्यात सोमवारी दिवसभरात राज्यात कोरोनाचे नवे 2 हजार 583 रुग्ण  आढळून आले आहेत. तर, 3 हजार 836 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरं होणाऱ्यांची संख्या जरी अधिक असली तर आणखी एक बाब मात्र चिंता वाढवत आहे.

सोमवारी एकूण 28 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्यात दररोज भर पडताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यात 63,40,723 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.18 टक्के (Corona Recovery Rate) इतका झाला आहे. आतापर्यंतच्या राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 65,24,498 वर पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!