बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आजची संख्या; पहा काय आहे तालुका निहाय स्थिती.

बीड दि.5 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज मंगळवारी 1219 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 28 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1191 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-7, अंबाजोगाई-1, आष्टी-4, धारुर-1, गेवराई-5, केज-3, माजलगाव-2, परळी-3, पाटोदा-0, शिरुर-2, वडवणी-0 अशी आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. सोमवारी
2 हजार 026 नव्या कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली असून, 5 हजार 389 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 97.31 टक्के एवढा झाला आहे.
राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांपैकी 63 लाख 86 हजार 059 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात 33 हजार 637 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत 8 कोटी 36 लाख 52 हजार 595 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.