नगर परिषदेच्या निवडणूकी संदर्भात राज्य निवडणूक आयोगाची महत्वाची घोषणा.

मुंबई दि.20 अॉगस्ट – राज्यातील डिसेंबर 2021 व फेब्रुवारी 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषदा व नगर पंचायती तसेच नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतीची प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्याच्या निवडणूक आयोगाने (State Election commission) आज दि.20 अॉगस्ट रोजी काढले आहेत.
(Important announcement of State Election Commission regarding Municipal Council elections.)
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 के व 243 झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी मतदार याद्या तयार करणे व या निवडणूकीचे अधिक्षण, संचालन व नियंत्रण करणे याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपवण्यात आलेली आहे. तसेच संविधानाच्या अनुच्छेद 243 आणि महाराष्ट्र नगर परिषदा, (Municipal Council) नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 41(1) नुसार नगर परिषदांची निवडणूक (Election) घेणे बंधनकारक आहे.
त्या अनुशंगाने राज्य निवडणूक आयोगाने आज आदेश जारी करत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अशा सर्व नगर परिषदा व नगर पंचायतीच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठीच्या सुचना जाहिर केल्या आहेत. यामुळे येत्या डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.