फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देवून अत्याचार ; धारुर तालुक्यातील घटना.

50 / 100 SEO Score

किल्लेधारूर दि.28 सप्टेंबर – फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देत मित्राकडून मित्राच्या बायकोवर बलात्कार केल्याचा गुन्हा धारुर तालुक्यात उघडकीस आला. याबाबत धारुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार धारुर तालुक्यातील एका गावात
फेसबुकवर (facebook) फोटो टाकण्याची धमकी देत मित्राच्या बायको बरोबर दुष्कृत्य केल्याची घटना घडली. याबाबत पिडितेने धारूर पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) तक्रार दिल्यानंतर आरोपी मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीच्या तक्रारीनूसार धारूर तालुक्यातील असोला येथील विवाहित तरुणीला तू भेटायला ये म्हणत धमकी देत तिला रस्त्याने येत असताना पांढऱ्या गाडीमध्ये बळच बसवून बांगरवाडी रस्त्यावर नेले. तिच्या गळ्यात हात टाकून अश्लील फोटो काढून तिला हे फोटो व्हायरल करतो म्हणून आरोपीने धमकी दिली व तिच्यावर बलात्कार केला.

सदरील घटना दि.12 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान घडली. यानंतर फिर्यादीस बलात्कार (Rape) करून धारूर (Dharur) येथे सोडून दिले व संबंधित आरोपी तेथून पसार झाला. याप्रकरणी संबंधित फिर्यादीच्या तक्रारीवरून गु.र.न. 232/22 कलम 376, 341, 500 भादविप्रमाणे आरोपी सचिन सिताराम वाव्हळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केज पोलिस (Kaij Police) उपविभागीय कार्यालयाच्या पोलिस उपनिरिक्षक (PSI) श्रीमती कोळी करत आहेत.
( Torture by threatening to post photos on Facebook; Incidents in Dharur Taluka. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!