कोरोंना विशेष

वऱ्हाडी पॉझिटीव्ह; वधूपित्यावर गुन्हा नोंद.

५० ते ६० वऱ्हाडी कोरोंटाईन

नेकनुरः दि.१२(प्रतिनिधी) बीड तालुक्यातील वंजारवाडी येथील मुलाचे दोन दिवसापूर्वी सोनपेठवाडी येथील मुलीशी विवाह झाला. या विवाहाला उपस्थित असणारा वंजारवाडी येथील एका वऱ्हाडीस दि.८ रोजी कोरोना लागण होवून पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. यामुळे नियमभंग करत  गुपचुप पार पडलेला विवाह प्रशासनाच्या रडारवर आला. याप्रकरणी वधूपित्यावर गुन्हा दाखल झाला असून विवाहास उपस्थित असणाऱ्या ५० ते ६० जणांना होम कोरंटाईन करण्यात आले आहे. यामुळे या दोन्ही गावांशी संपर्कात आलेल्या अनेक गावातही खळबळ उडाली आहे.

बीड तालुक्यातील नेकनुर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोनपेठवाडी येथील रेखा मालू तोंडे हिचा विवाह वंजारवाडी येथील आकाश तांदळे याच्याशी सात जुलै रोजी शेतवस्तीवर पन्नास-साठ लोकांच्या उपस्थितीत पार पडला. या विवाहास उपस्थित असणारा वंजारवाडी येथील एक ग्रामस्थ आजारी पडल्याने दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल झाला. त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह  आल्याने या विवाहाचा भांडाफोड झाला. ग्रामसेवक अनिल शिंदे यांच्या फिर्यादीवरून नेकनुर पोलिसात नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी वधूपिता मालू कारभारी तोंडे यांच्या विरोधात कलम-१८८,२६९,२७० भा.दं.वि. स.५१ ब आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र कोवीड-१९ वि-नियमन २०२० चे कलम ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होम क्वारनटाईनचा कालावधी संपल्यानंतर पुढील तपास करून उर्वरित लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही या वेळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक  लक्ष्‍मण केंद्रे यांनी दिली. पुढील तपास जमादार शिंदे, युनूस बागवान हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!