मराठा क्रांती मूक राज्यव्यापी आंदोलनास सुरुवात; पहा कोण सहभागी, काय आहेत प्रतिक्रिया.

कोल्हापूर दि.16 जून – मराठा क्रांती मूक राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज दि.16 जून बुधवारी कोल्हापुरातून झाली. आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासमोर सकाळी 10 ते 1 या वेळेत आंदोलन करण्यात आले. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे.

(Maratha Revolution begins silent statewide agitation; See who the participants are, what the reactions are.)

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), खासदार संजय मंडलिक, खा. धैयशील माने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, विनय कोरे, राजू आवळे, प्रकाश आबिटकर आणि शाहू छत्रपती महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) सहभागी झाले आहेत.

कोण काय म्हणाले…
सरकार जबाबदारी घेण्यास कमी पडणार नाही : सतेज पाटील
सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले की, “संभाजीराजे छत्रपती यांच्या मागण्यांबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक आहे. सरकार एक पाऊल पुढे यायला तयार आहे. पुन्हा एकदा भेटून चर्चा करणं गरजेचं आहे. सरकार उद्याच्या उद्या संभाजीराजे यांना वेळ द्यायला तयार आहेत. सरकार आणि संभाजीराजे यांनी चर्चा करुन मार्ग काढूया. हातात हात घालून आपण काम केलं पाहिजे. सरकार जबाबदारी घेण्यास कुठेही कमी पडणार नाही.

“कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आहोत. उच्च न्यायालयात टिकलेला कायदा सुप्रीम कोर्टात टिकू शकला नाही. हे आंदोलन ज्या उद्दिष्टाने सुरु केलं आहे त्या उद्दिष्टापर्यंत जावं, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. तसंत सरकारने काही केलं नाही हे बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. जे आधीचे वकील होते तेच मुद्दा मांडत होते, मात्र कोर्टाचा निर्णय विरोधात आला, असा टोला सतेज पाटील यांनी भाजपला लगावला.

वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू : हसन मुश्रीफ
“मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोन वेळा आंदोलन केलं. पण आरक्षण कोर्टात टिकलं नाही. नारायण राणे यांची समिती नेमून आरक्षण देणं ही आमची चूक होती,” असं राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले. कायदा व्यवस्थित असता तर तो टिकला असता ना, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भापवर निशाणाही साधला. तसेच सारथी, नियुक्ती पत्र असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज देणं असेल हे सगळे प्रश्न आम्ही पूर्ण करणार आहोत. वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही देखील हसन मुश्रीफ यांनी दिली.

पंतप्रधानांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं- शाहू महाराज
मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधानांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी वक्त केली. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात निकाल लागला आहे. आता त्याच ठिकाणाहून आपण सुरुवात केली पाहिजे.

फेरविचार याचिकेत खूप वेळ जाईल, त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल. नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. इतक्या घटना दुरुस्त्या केल्या मग आता का करत नाही हे समजत नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान यांचं काय मत आहे हे समजलं पाहिजे.”

आधीच्या सरकारने दिल्या होत्या त्या सवलती आताच्या सरकारने द्याव्यात- चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘मी कोल्हापूरचा नागरिक म्हणून आलो आहे. या आंदोलनात भाजपचे नेते सहभागी होतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) सवलती आधीच्या सरकारने दिल्या होत्या त्या आताच्या सरकारने द्याव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सरकार कमी पडलं म्हणून ही परिस्थिती उद्भवली-प्रकाश आंबेडकर
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. मी आधीही सांगतोय आणि आताही सांगतोय आमचा मराठा आंदोलनाला पाठिंबा असणार आहे, असं यावेळी ते म्हणाले. तसेच सरकार कमी पडलं म्हणून ही परिस्थिती उद्भवली. आता ज्याने आरक्षण मिळेल असा चांगला मार्ग सरकारने निवडावा असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आरक्षणाबाबत जुन्या-नवीन सरकारने ज्या दक्षता घ्यायला हवी होती ती घेतली गेलेली नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, या आंदोलनास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!