व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरस पसरवण्याचा प्रयत्न … यावर असा लावा ब्रेक.

नवी दिल्ली दि.19 एप्रिल – सायबर तज्ज्ञांनी लिंकद्वारे फोनवर पाठवण्यात येत असलेल्या व्हायरसबाबत (WhatsApp virus attack) सावध केले आहे. या लिंकमध्ये वेगवेगळ्या स्वरुपाचा दावा करण्यात येत आहे. यात व्हॉट्सअप गुलाबी रंगाचे होईल आणि नवीन वैशिष्ट्यांचा समावेश होईल असाही एक दावा करणारी लिंक आहे.

(Trying to spread the virus on WhatsApp group … put a brake on it.)

सायबर सुरक्षा तज्ज्ञांनुसार, लिंकमध्ये दावा करण्यात येतो की, ती व्हॉट्सअपकडून (Whatsapp virus attack) अधिकृत अपडेटसाठी आहे, परंतु लिंकवर क्लिक करताच संबंधित वापरकर्त्याचा फोन हॅक होईल आणि तो व्हॉट्सअपचा वापर करू शकणार नाही.

व्हॉट्सअप पिंक नावाने लिंक, क्लिक करू नका
सायबर सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजहरिया यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे, व्हॉट्सअप पिंकबाबत सवाधान!

एपीके डाऊनलोड लिंकसह व्हॉट्सअप ग्रुप व्हायरस पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्हॉट्सअप पिंकच्या नावाच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. लिंक क्लिक केल्यानंतर फोनचा वापर करणे अवघड होईल.
सायबर सुरक्षेशी संबंधीत कंपनी वोयागेर इन्फोसेकचे संचालक जितेन जैन यांनी म्हटले की, वापरकर्त्यांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी गुगल किंवा अ‍ॅप्पलच्या अधिकृत अ‍ॅप स्टोअरशिवाय एपीके किंवा अन्य मोबाइल अ‍ॅप इन्स्टॉल करू नये.

याबाबत संपर्क केल्यानंतर व्हॉट्सअपने म्हटले, जर एखाद्याला संशयास्पद मेसेज किंवा ई-मेलसह काही मेसेज आला तर त्यास उत्तर देण्यापूर्वी संपूर्ण तपासून घ्या आणि सतर्क रहा. व्हॉट्सअपवर आम्ही सल्ला देतो की, आम्ही ज्या सुविधा दिल्या आहेत, त्यांचा वापर करा, आम्हाला रिपोर्ट पाठवा, संपर्काबाबत माहिती द्या किंवा त्यास ब्लॉक करा.

अशाच स्वरुपाच्या आणखी काही लिंक व्हॉट्सअपवर शेअर होत आहे. यातून बचाव करण्यासाठी पर्यायी सेंटींग सांगितले जाणाऱ्या पोलिसांची मेसेजही व्हायरल होत आहेत. यात सांगितल्याप्रमाणे सेंटींगमध्ये जावून Apps Manager – Online stream Apps – Clear cache – clear data – Force Stop- uninstall अशा स्वरुपाची दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!