केज तालुक्यात होळ येथे अपघातात दोघांचा मृत्यू तर माळेगावात एक मृतदेह आढळला….

केज दि. १५(प्रतिनिधी)- केज तालुक्यातील होळ येथे आज दि.१५ सोमवार रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास जीप व दूचाकीच्या अपघातात (Accident) दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून केज तालुक्यातीलच मालेगाव येथे आज सकाळी एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केज तालुक्यातील होळ येथील महेंद्र भिमराव घुगे व अजिंक्य धस दुचाकीवरुन जात असताना दिपेगाव पाटीजवळ क्रुजर जीपने दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात (Accident) महेंद्र भिमराव घुगे (२०) हा जागीच ठार झाला तर अजिंक्य धस (२०) हा गंभीर जखमी झाला. जखमी अजिंक्यचे उपचारा दरम्यान निधन झाल्याची माहिती येत आहे. आज साधारण साडेदहा वाजता हा अपघात झाला.
माळेगाव शिवारात मृतदेह (Dead Body) आढळला
केज तालुक्यातील मालेगाव शिवारात कळंब येथील २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. कळंब येथील रंगकाम करणाऱ्या लखन महादेव सोणावने याचा हा मृतदेह (Dead Body) असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी युसूफवडगाव पोलिस (Police) ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले असून तपास सुरु केला आहे. सदरील मृतदेह तुकाराम गुंठाळ यांच्या गव्हाच्या शेतात आढळले. मयत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याचे दिसुन आले. पोलिस (Police) तपासात सदरील प्रकार हा घात की अपघात चा उलगडा होईल.