दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू; बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन मधील घटना.

गेवराई दि.28 अॉगस्ट – आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गेवराई (Gevrai) तालुक्यातील शनीचे राक्षसभुवन येथे आज शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाली आहे.
(Two sisters drowned; Incident at Rakshasabhuvan in Beed district.)
नेहा धर्मराज कोरडे (वय 9 वर्ष) व अमृता धर्मराज कोरडे (वय 8 वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिस ठाण्याचे नवनियुक्त सहायक पोलिस निरीक्षक (Assistant Police Inspector) भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मुलींचे मृतदेह पाण्याबरोबर काढले. तसेच घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
गेवराई तालुक्यात यापुर्वी देखील मिरगाव, संगमजळगाव येथे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मुलींचे गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच शनिवारी राक्षसभुवन याठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.