धारुर व माजलगावात दुचाकीची समोरासमोर धडक; दोन जण ठार.

किल्लेधारूर/माजलगाव दि.27 अॉगस्ट – आज दि.27 शुक्रवारी धारुर व माजलगाव (Majalgoan) नजीक दोन वेगवेगळी दुचाकी अपघाताच्या घटना घडल्या. माजलगाव जवळ असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर झालेल्या दुचाकीच्या अपघातात (Accident) लघुपाटबंधारे विभागातील (Irrigation Department) निवृत्त अभियंत्यासह एकाचे निधन झाले आहे. तर धारुर जवळील जागीर मोहा घाटातही दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याची माहिती समोर आली आहे.
(Two-wheeler collision in Dharur and Majalgaon; Two killed.)
दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि.27 शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास माजलगाव तेलगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर (Reliance Petrol Pump) घडली. अरुण जगन्नाथ शेजूळ (वय 65 रा. आबेगाव ह.मु.माजलगाव), नंदकुमार संतराम महिपाल (वय 38, रा.शिंदेवाडी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
अरुण शेजूळ हे माजलगावहून खामगाव पंढरपूर महामार्गावरून (Highway) दुचाकीवरुन शेतात जात होते. रिलायन्स पंपाजवळ आल्यानंतर त्यांनी अचानक गाडी वळवली. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या नंदकुमार संतराम महिपाल यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. दुचाकीवरुन दोघेही रस्त्यावर पडले. रस्त्यावर पडल्याने दोघांच्याही डोक्याला मार लागल्याने गंभीररित्या जखमी झाले.
उपचारासाठी दोघांनाही माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. अरुण शेजूळ हे जलसंपदा विभागात अभियंता होते. दोन वर्षापासून ते निवृत्त झाल्याने शेती व्यवसाय करत होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. तर दुसरी घटना धारुर जवळील जागिर मोहा घाटात घडल्याची सोशल मेडियात व्हायरल झाले आहे. दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या असून याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.