दुर्दैवी घटना … बी भरणाला पैसे नसल्याच्या कारणावरून शेतकऱ्याची आत्महत्या; धारुर तालुक्यातील धक्कादायक घटना.

किल्लेधारूर दि.21 जून – धारुर तालुक्यातील कांदेवाडी येथील 55 वर्षीय इसमाने बि भरणासाठी पैसे नसल्याच्या कारणाने विष प्राशन करत आत्महत्या (Suicide) केल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली.
(Unfortunate incident … Farmer commits suicide due to lack of money to pay B .. Shocking incident in Dharur taluka.)
सध्या खरीप हंगामात शेतकरी (Farmer) पेरणीसाठी जुटला असताना धारुर तालुक्यातील कांदेवाडी येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कोरोना संकटात आर्थिक अडचणीत सापडलेल्या हंगामी शेती करणारा शेतकरी वर्ग चिंतातूर असल्याचे दिसत आहे.
वैजनाथ महादा लटपटे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मयत शेतकऱ्यावर ग्रामीण बँकेचे 99 हजार रुपये कर्ज आहे. कर्जबाजारीपणा चा सामना करत आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शेतकऱ्या (Farmer) जवळ बी भरणा साठी पैसे नव्हते. या कारणाने या शेतकऱ्याने रविवारी मध्यरात्री विष प्राशन (Poisoning) करुन आत्महत्या (Suicide) केली.
सदरील शेतकऱ्यांने विष प्राशन (Poisoning) केल्याचे नातेवाईकांना लक्षात आल्यानंतर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार दरम्यान वैजनाथ लटपटे यांचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला आहे. या घटनेने कांदेवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत होती.