दिलासादायक … बीड जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.21 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 3715 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 720 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2995 जण निगेटिव्ह आली आहेत. राज्या पाठोपाठ बीड जिल्ह्यातही बाधितांची संख्या कमी कमी होत आहे. यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी हजाराच्या आत आकडा आला आहे.

(Comfortable … Today’s corona update of Beed district; See Taluka wise statistics.)

आज बीड तालुक्यात केवळ 48 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या बीड पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 61 व आष्टी तालुक्यात 100 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 70 तर केजमध्ये 102 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे. जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, आष्टी नंतर केज व गेवराईत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-48, अंबाजोगाई-61, आष्टी-114, धारुर-70, गेवराई-66, केज-102, माजलगाव-71, परळी-35, पाटोदा-71, शिरुर-76, वडवणी-20 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दररोज हजारावर येत आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांनी काल नवीन आदेश काढत आता ग्रामीण भागातील सौम्य लक्षणे असणाऱ्या बाधितांना गावातच संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राज्यात नव्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आता घट होताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 29 हजार 911 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 47 हजार 371 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.43 टक्के इतके आहे. मात्र, कोरोना मृत्यूचा आकडा हा कालच्या तुलनेत आज वाढला आहे. गेल्या 24 तासांत 738 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!