शेती विषयक

वा रे पठ्ठे… थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच मागितली गांजा लावण्याची परवानगी; सोशल मिडीयात निवेदन व्हायरल.

सोलापूर दि.26 अॉगस्ट – सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शिरापूर ता.मोहोळ येथील शेतकऱ्याने (Farmer) थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच शेतात दोन एकर गांजा लावण्याची परवानगी मागणारे निवेदन सध्या सोशल मिडीयात (Social media) धुमाकूळ घालत असून या अजब निवेदनाची चांगलीच चर्चा होत आहे.

(Wa re patte … Permission to plant cannabis directly sought from the Collector; The statement went viral on social media.)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अनिल आबाजी पाटील (मो.नं. ९६५७१६६४७५) रा. शिरापूर (सो), ता. मोहोळ, जि. सोलापूर या शेतकऱ्याने दि.25 अॉगस्ट रोजी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदन दिले आहे. निवेदनाचा विषय शेतात दोन एकर गांजा लावणेस परवानगी मिळणे बाबत असे दिले आहे. तर निवेदनात खालील मजकूर लिहिला आहे.

महोदय,
वरील विषयास कारणे विनंती अर्ज करतो की, माझी शिरापूर (सो), ता. मोहोळ येथे स्वताःच्या मालकीची जमीन गट नं. १८१/४ असून या क्षेत्रात दोन एकर गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी दयावी हि नम्र विनंती. मी शेतकरी असून कोणतेही पिक केले तरी त्याला शासनाचा हमी भाव नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवीडमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही.

तसेच एखाद्या साखर कारखान्याला (sugar factory) ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही. त्यामुळे गांजाला चांगला भाव असल्यामुळे मला माझ्या वर नमुद गटामध्ये दोन एकर गांजा लागवड करण्याची दि. १५/०९/२०२१ पर्यंत लेखी परवानगी दयावी अन्यथा मी दि.१६/०९/२०२१ या दिवशी आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली असे गृहित धरुन मी लागवड सुरु करणार आहे व माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील हि नम्र विनंती.

अशा आशयाचे निवेदन सध्या सोशल माध्यमात व्हायरल झाले आहे. सदरील निवेदनावर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय (collector) व पोलिस अधिक्षक (superintendent of police) कार्यालयाची दि.25 रोजी निवेदन मिळाल्याची मोहर लावलेली आहे. या निवेदनावर सोशल माध्यमातून अनेक प्रतिक्रिया मिळत असून सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र 19 सप्टेंबरपर्यंत प्रशासन या निवेदनाची दखल कशा पध्दतीने घेणार हे पाहणे औत्सूक्याचे राहणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!