सांस्कृतिक

संस्कृती जपणाऱ्या धारुर तालुक्यात महादेव कोळी जमातीची वाघबारस…. पहा अनोखी दिवाळी

किल्लेधारूर दि.१३- धारुर तालुका बहुतांश डोंगरी. या डोंगरी भागात अनेक आदिवासी जमाती पुरातन काळापासून आपली संस्कृती जपून आहेत. बालाघाट डोंगररांगेत वास्तव्यास असलेल्या कोळी महादेव Mahadev Koli या अनुसूचित (आदिवासी) जमातीच्या लोकांनीही दिवाळीत Diwali साजरा होणारा वसुबारस Vasubaras ज्यास वाघबारस Waghbaras असे संबोधतात आजही पारंपारिक पध्दतीने जपली आहे. दि.१२ गुरुवार रोजी प्रर्षीप्रमाणे याही वर्षी वाघबारस Waghbaras मोठ्या उत्साहात साजरी करत संस्कृती संवर्धन केले आहे.

दिवाळी हा प्रकाशाचा दिपोत्सव संपूर्ण भारतात वेगवेगळ्या सांस्कृतिक व पारंपारिक पध्दतीने ज्या त्या भागातील रुढी परंपरेनुसार साजरा होतो. दिवाळीचा Diwali पहिला दिवस सर्वत्र वसुबारस Vasubaras हा गाय व वासरु यांचे पुजन करुन साजरा होतो. धारुर तालुक्यातील बालाघाटच्या डोंगररांगेत आदिवासी असलेल्या महादेव कोळी Mahadev Koli समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. आजही हा समाज आपल्या पारंपारिक सण, उत्सव अनोख्या पध्दतीने साजरा करत असतो. दिवाळीची Diwali सुरुवात वसुबारस Vasubaras ही हा समाज  वाघबारस Waghbaras म्हणून  साजरी करतो. काल दि.१२ रोजी ती साजरी करण्यात आली. अनुसूचित जमाती संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र व समस्त गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने धारुर Dharur तालुक्यात बालाघाट डोंगर रांगेत मौजे पहाडी पारगाव येथे वाघबारस निमित्त विविध आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिवर्षी घेण्यात येत असतात. परंतु यावर्षी कोरोनाचा धोका लक्षात घेता वाघबारसीचा सण एकदम साध्या पद्धतीने परंतु उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी गुराखी मुलांनी घरोघरी जाऊन खिरीचे साहित्य गोळा केले. नंतर त्याची खीर करण्यात आली. काही गुराखी वाघ बनले तर काही खिरीची रक्षक बनले व खेळ खेळण्यात आला. या खेळाच्या दरम्यान वाघाच्या अंगावर खीर पडली व वाघबारसं साजरी झाल्याचे जाहीर झाले. तसेच वाघदेवतेचे भगत सुग्रीव वरकले यांच्या हस्ते आदिवासी पद्धतीने पूजा मांडून, आरती करून, खिरीचा नैवद्य दाखवून व विविध आदिवासी गाणे म्हणून वाघदेवतेला आवाहन करण्यात आले. यानंतर सर्व भक्तांना खिरीचा प्रसाद देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!