क्राईम

Walmik Karad वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस म्हणून कोयत्याने मारहाण; एक गंभीर जखमी.

60 / 100

किल्लेधारूर दि.6 फेब्रुवारी – Walmik Karad धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील तरनळी (ता.केज) येथे दि.5 बुधवार रोजी दुपारी वाल्मीक कराड व मुंडे साहेबांच्या बातम्या पाहिल्या तर तुझा संतोष देशमुख करू म्हणत गावातील दोन युवकांनी अशोक मोहिते याला लाथा बुक्क्याने, लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण करून जखमी केले. मोहिते सध्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याचा मावस भाऊ बालासाहेब भोसले याच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये 2 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी गुरूवारी (दि.6) सकाळी तरनळी गावात जाऊन शांततेचे आवाहन केले आहे.

धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील तरनळी (ता.केज) गावामध्ये दि.5 फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी अडीच वाजता गावातील रमाई चौक या ठिकाणी अशोक शंकर मोहिते हा मोबाईल वर व्हिडिओ पाहत असताना गावातील एका लाल रंगाच्या MH 44 R 9294 या मोटार सायकलवर वैजनाथ भारत बांगर व अभिषेक सिद्धेश्वर सानप हे दोघे आले व त्यांनी अशोक मोहिते याला लाथाबुक्याने, लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण केली व यापुढे वाल्मिक कराड व मुंडे साहेबांच्या बातम्या पाहिल्या तर तुझा संतोष देशमुख करू म्हणत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी अशोक मोहीते याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार करून सह्याद्री रुग्णालय लातूर येथे पुढील उपचार सुरू आहेत . मोहिते यांचा मावस भाऊ बालासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये सानप व बांगर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी गुरूवारी (दि.6) सकाळी तरनळी येथे जाऊन शांततेचे आवाहन केले असून साक्षीदाराचे जवाब घेऊन जखमी व फिर्यादीचे जवाबासाठी लातूर कडे रवाना झाले. आरोपीच्या शोधात एक पथक रवाना केले असून घटनेचा योग्य तपास केला जाईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे या़नी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!