युध्दाला सुरुवात… रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा.

आंतरराष्ट्रीय वृत्तसेवा दि.24 फेब्रुवारी – रशिया आणि युक्रेनमधील वाद (Ukraine-Russia crisis) चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच मोठी घडामोड समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (President Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली असून युद्धाचे ढग अजूनच गडद झाले आहेत.

( War begins … Russian President Vladimir Putin announces military action in Ukraine. )

युक्रेन आणि रशियामधील युद्ध (War) टाळलं जाऊ शकत नाही असं पुतीन म्हणाले आहेत. पुतीन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करत असल्याचं सांगण्यात आलं. या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घरी निघून जा असंही सांगितलं आहे.

पुतिन यांची इतर देशांना धमकी
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनविरोधात लष्करी कारवाईची (Military action) घोषणा करताना धमकीही दिली आहे. यात त्यांनी सांगितलं आहे की, “यामध्ये पडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. इतिहासात कधीच भोगावे लागले नाहीत अशा परिणामांना सामोरं जावं लागले. सर्व महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तुम्ही मला ऐकलं असेल अशी आशा आहे”.

समाजमाध्यमांतून युक्रेनमध्ये शिरत असलेल्या रणगाड्यांच्या व्हायरल होत असलेल्या द‍ृश्यांनी युक्रेनियन रहिवाशांना धडकी भरवलेली आहे. पूर्व युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होईल, अशी भीती वर्तविली जात आहे.

सध्याच्या परिस्थितीत डोनेट्स्क, लुहान्स्कचा एक तृतीयांश भाग रशिया समर्थक बंडखोरांच्या ताब्यात आहे. उर्वरित भाग युक्रेनच्याच नियंत्रणाखाली आहे. आता रशियाच्या फौजा या भागांतही घुसणार म्हटल्यावर मोठा संघर्ष होईल, असे मानले जात आहे. सामरिक बळाची तुलना केली असता, रशिया युक्रेनपेक्षा किती तरी पटीने वरचढ आहे.

युक्रेनमधील पूर्वेकडील बंडखोरांच्या प्रत्यक्ष ताब्यात नसलेल्या भागांवरही रशियन फौजा आपला कब्जा जमविण्यात यशस्वी होतील, असेही मानले जाते. अर्थात, युक्रेनकडूनही मजबूत तटबंदी करण्यात आली आहे. 451 किलोमीटर लांबीच्या संपर्क रेषेवर भूसुरुंग पेरण्यात आले आहेत. मोर्चेबंदीही केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!