पुजा चव्हाण प्रकरणात बदनामी करणाऱ्यांविरोधात प्रत्येक जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्याचा इशारा….

बीड: दि.१४- पूजा चव्हाण आत्महत्या  प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) भाजपने थेट शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं नाव घेतलं आहे. संजय राठोड यांचे कार्यकर्ते अरुण राठोड (Arun Rathod) याचं नावही या प्रकरणात आलं आहे. मात्र, या प्रकरणामुळे बंजारा समाजाची बदनामी होत असल्याचं सांगत बंजारा नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अरुणच्या गावातील ग्रामस्थांनी तर समजाची बदनामी करणाऱ्यांविरोधात प्रत्येक जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

(Beed villagers reaction on Pooja Chavan Suicide Case)

अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथील रहिवासी आहे. पूजा चव्हाण प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) त्याचं नाव आल्यापासून त्याच्या गावातील लोक संतप्त झाले आहेत. अरुण राठोड (Arun Rathod) हा अत्यंत साधा मुलगा आहे. अरुण पदवीधर असून पुढील शिक्षणासाठी दोन महिन्यापुर्वी तो पुण्याला गेला होता. त्याचे गावातील सर्व लोकांसोबत अत्यंत चांगले संबंध आहेत. शिक्षण आणि घर हेच त्याचं जग आहे. असं असताना त्याच्यावर आरोप करून समाजालाही बदनाम केलं जात असून आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा त्याच्या गावातील ग्रामस्थांनी दिला आहे. काही लोकांनी समाजाची जाणूनबुजून बदनामी सुरू केली आहे. त्यामुळे बीड, यवतमाळ, औरंगाबाद, जालना आणि राज्यातील इतर भागात उद्यापासून आंदोलनं करण्यात येणार असल्याचंही या ग्रामस्थांनी सांगितलं. “राठोडगिरी” असे शब्द वापरून समाजाला बदनाम न करण्याचं आवाहनही या ग्रामस्थांनी केलं. व्हायरल क्लिपमधील आवाजाबाबत ग्रामस्थांनी शंका उपस्थित केली आहे. हा आमच्या नेते संजय राठोड (Sanjay Rathod) व अरुण राठोड यांचा आवाज नसल्याचे गावकऱ्याचे म्हणने आहे. गावातील पुरुषांसह महिलांनीही संजय राठोड व अरुण राठोड यांची पाठराखण करत समाजाची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप केला. सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत समाजाच्या नेत्यावर अन्याय होवू देणार नसल्याचा इशारा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!