कोरोनामुळे जगभरात २० लाख मृत्यू होण्याची जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) भीती

कोरोना (Corona) मुळे जगभरात २० लाख मृत्यू होण्याची भिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केली.

कोरोनावर (Corona) लस शोधण्यासाठी भारतासह अमेरिका, रशिया, चीन अशी अनेक देश प्रयत्नशील आहेत. मात्र कोरोनाचा प्रतिबंध करणारी लस येण्या आधीच जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केली आहे. सध्याच्या घडीला जगभरात कोरोना (covid-19) बाधित रुग्ण संख्या ३ कोटी २० लाखांपेक्षा जास्त आहे. भारतातही रुग्ण संख्या ६० लाखाकडे वाटचाल करत आहे.

युएन (UN) एजन्सीच्या इमर्जन्सी प्रोग्रामचे प्रमुख माईक रेयान यांनी ही भीती बोलून दाखवली आहे. कोरोना व्हायरसची (covid-19) बाधा होऊन मागील ९ महिन्यांमध्ये जगभरात ९.९३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे असेही यावेळी सांगण्यात आले. लस बाजारात येण्या आधीच ही संख्या दुप्पट होईल म्हणजेच कोरोनाची (Corona) प्रभावी लस येण्याआधीच २० लाख मृत्यू होऊ शकतात अशी शक्यता अधिक असल्याची माहिती रेयान यांनी यावेळी दिली. अमेरिकेत २ लाखांपेक्षा जास्त, भारतात ९३ हजारांपेक्षा जास्त, ब्राझिलमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त तर रशियात २० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू कोरोना (covid-19) मुळे  झाला आहे. अमेरिकेत ७० लाखांपेक्षा जास्त कोरोना (covid-19) रुग्ण आहे तर भारतात ही संख्या ५९ लाखांवर आहे. रॉयटर्सने या संदर्भात वृत्त दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!