IPS सोमय मुंडे यांच धारुर, अंबाजोगाईचं नातं काय? 26 नक्षलवाद्यांना घातलं कंठस्नान.

किल्लेधारूर दि.16 नोव्हेंबर – गडचिरोली जिल्ह्यातील मरदीन टोला परिसरात पोलीस (Police) आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपुर्वी घडली. यानंतर या अॉपरेशनचे नेतृत्व करणारे IPS अधिकारी सोमय मुंडे (Somay Munde) चर्चेत आले असून मुंडे यांचा बीड (Beed) जिल्ह्याचा जवळचं नातं आहे. यामुळे बीड जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

(What is the relationship of IPS Somay Munde with Dharur, Ambajogai? 26 Naxalites put on throat bath.)

या मोहिमेत गेल्या अनेक वर्षांपासून नक्षली चळवळीत सक्रिय असलेला मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याला ठार करण्यात यश आलं. त्यामुळे सगळीकडेच याची चर्चा होत आहे. या ऑपरेशनमध्ये लीड करणारे अधिकारी सोमय मुंडे यांचं मोठं योगदान आहे. सध्या नांदेड (Nanded) जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी आणि एका डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा असलेल्या IPS अधिकारी सोमय मुंडे यांनी तब्बल नऊ तास नक्षलवाद्यांशी झुंज देत ही मोहीम फत्ते करून दाखवली.

कोण आहेत सोमय मुंडे?
सोमय विनायक मुंडे हे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील देगलूर येथील मूळ रहिवासी आहेत. 31 वर्षे वयाच्या सोमय विनायक मुंडे यांचं लहानपणापासूनच आयपीएस अधिकारी (IPS officer) व्हायचं स्वप्न होतं. सोमय मुंडे यांचे शिक्षण एमटेक, आयआयटीमध्ये (IIT) झाले. सोमय मुंडे यांचे शालेय शिक्षण हे देगलूर येथील साधना हायस्कूलमध्ये झाले. तर माध्यमिक शिक्षण सातारा सैनिकी शाळा आणि राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज डेहराडून या ठिकाणी झालं. सोमय यांनी आयआयटी आणि एमटेक ही पदवी संपादन केलेली असून, सोमय हे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) 2016 ची परीक्षा पास होऊन IPS अधिकारी झाले आहेत.

डॉ. मुक्ता आणि डॉ. विनायक चंद्रसेन मुंडे यांचे चिरंजीव
आयपीएस अधिकारी सोमय मुंडे हे देगलूर येथील डॉक्टर दाम्पत्य डॉ. मुक्ता विनायक मुंडे आणि डॉ. विनायक चंद्रसेन मुंडे यांचे चिरंजीव आहेत. वडील विनायक मुंडे मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) येथील सनगाव येथील मूळ रहिवाशी असून, गेल्या 40 वर्षांपासून देगलूर येथे स्थायिक आहेत. डॉ. विनायक मुंडे हे जनरल सर्जन तर आई डॉ. मुक्ता ह्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. त्यांना दोन मुले असून, सोमय हे थोरले असून मुलगी सुमंता ह्या कॉम्प्युटर सायन्स करत आहे.

धारुरशी काय आहे नातं..
सोमय मुंडे यांचं धारुरशी (Dharur) जवळचं नातं आहे. मुंडे यांचे आजोबा चंद्रसेन मुंडे हे धारुर तालुक्यातील भोगलवाडी येथील मुळ रहिवासी व धारुर येथे अनेक वर्षे वैद्यकीय सेवा देणारे डॉ. विठ्ठलराव माधवराव तिडके यांचे मेहूणे आहेत. डॉ. विनायक मुंडे यांचं डॉ. तिडके यांच्याशी अगदी जवळचं नातं आहे.

पहिली पोस्टिंग ही औरंगाबाद जिल्ह्यात
सोमय विनायक मुंडे यांची पहिली पोस्टिंग ही औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणी झाली. त्यानंतर ASP अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे आणि आता गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी येथे ऍडिश्नल एसपी (Superintendent of Police) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या अगोदर अनेक धाडसी कार्यवाही केल्यात. ज्यात मार्च 2021 छत्तीसगड परिसरातील अबुजमाळ येथे नक्षली परिसरात जाऊन त्यांचा अड्डा उद्ध्वस्त करत एन्काऊंटर कार्यवाही करून शस्त्र हस्तगत केले होते. तर जून 2021 रोजी गडचिरोली येथील अटापल्ली येथे धाडसी कार्यवाही करत 13 नक्षलींना कंठस्नान घातले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!