महिला नायब तहसीलदारावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; केज तहसीलमधील प्रकार.

केज दि.6 जुन – केज तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार आशा वाघ ( गायकवाड ) यांच्यावर कार्यालयातच कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सदरील हल्ला हा त्यांच्या भावानेच केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

कोयत्याने चार वार केल्यामुळे नायब तहसीलदार आशा वाघ ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोरास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर आशा वाघ यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले असल्याचे समजते.

अशी घडली घटना….
आशा वाघ स्वतःच्या कार्यालयात असताना तेथे त्यांचा भाऊ आला. त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही समजण्याच्या आत जवळील धारदार कोयत्या सारख्या शस्त्राने हल्ला केला. यामध्ये आशा वाघ या गंभीर जखमी झाल्याने प्रथम उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल करण्यात आले. येथे प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तहसील कार्यालयात धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. चक्क नायब तहसीलदार असलेल्या महिलेवर कार्यालयात जिवघेणा हल्ला झाल्याने केज शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

( Woman deputy tehsildar attacked with a scythe; Types in Kaij Tehsil.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!