सावधान सुटी सिगारेट किंवा बिडी विकल्यास होईल कारवाई….

मुंबईः दि.१-आक्टोंबर-आरोग्य विभागाने आरोग्याचा संदेश पोहचविण्याला अडथळा निर्माण होत असल्यामुळे नवीन आदेश काढत आता महाराष्ट्र राज्यात कुठेही सुटी सिगारेट (cigarette) किंवा बिडी विकायला बंदी घातली आहे. सुटी विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कायद्यानूसार आता कारवाई होवू शकते.
शासन जनहितार्थ अनेक निर्णय घेत असते. परंतू कायद्याला पळवाटा शोधणारे अनेक नवनवीन मार्ग काढून पळवाटा शोधतात. आरोग्यास अपायकारक असलेल्या तंबाखूजन्य पदार्थासाठी यापुर्वी सिगारेट (cigarette) व अन्य तंबाखूजन्य उत्पादन अधिनियम-2003’ करण्यात आला. (जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) याच्यानुसार सिगारेटच्या पाकिटाच्या ८५ टक्के भागावर सिगारेट (cigarette) वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश असने बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे सिगारेट (cigarette) हे आरोग्याला धोक्याचे असल्याचा संदेश दिला गेला. परंतु, सिगारेटच्या पाकिटातून सिगारेटची आणि बिडीची एकेक करुन सुटी विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे आरोग्याचा संदेश पोहचविण्याला अडथळा निर्माण होत आहे. म्हणून आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला. कायद्याप्रमाणे, शाळा-महाविद्यालये तसेच रुग्णालये व धार्मिक स्थळांच्या शंभर मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी लागू करण्यात आलेली आहे.