धारुरच्या शांत संयमी तरुण पत्रकारावर नियतीचा घाला ; रईसखान पठाण यांचे निधन.

किल्लेधारूर दि.22 अॉगस्ट – धारुरच्या शांत संयमी तरुण पत्रकारावर नियतीने आज घाला घातला. धारूर (Dharur) शहराचे भूमिपुत्र उर्दू एशिया एक्सप्रेस दैनिकाचे बीड जिल्हा प्रतिनिधी ( journalist ) रईसखान नासरखान पठाण (वय 43) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज सोमवार दि.22 रोजी सकाळी 8 वाजता निधन झाले.
किल्लेधारूरचे रहिवासी व सध्या बीड (Beed) येथील इंदिरा गांधी उर्दू माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे ज्ञानदान करणारे रईस खान (फतेहबादी) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) निधन झाले. पहाटे अचानक छातीत जळजळ होत असल्याने त्यांना बीडमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला व यातच त्यांची प्राणज्योत मावळली.
अतिशय शांत, संयमी व बुध्दीमान पत्रकार, शिक्षक व शायर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धारुर येथील मिल्लिया उर्दू शाळेत तर उच्चशिक्षण औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयात झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे 43 वर्ष होते. उर्दू पत्रकारितेत (Press reporter) त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली होती. अतिशय गरीब कुटूंबातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली व दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. त्यांचा दफनविधी आज सांयकाळी बीड येथील शंहेशाहवली दरगाह परिसरातील बारादरी कब्रस्तानमध्ये होणार आहे.
( A calm and restrained young journalist of Dharur was struck by destiny; Death of Raiskhan Pathan.)