महाराष्ट्राची चिंता वाढली… पुण्यात आढळले 8 ओमिक्रॉन बाधित; दिल्लीतही शिरकाव.

पुणे दि.5 डिसेंबर – आज भारताच्या चौथ्या राज्यात म्हणजेच दिल्लीत (Delhi) ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात आजा पिपंरी चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 2 ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या आता 9 झाली आहे.
(Worrying news for Maharashtra … 8 omcrons found today.)
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला होता. यामध्ये आता आणखी सात जणांची भर पडली आहे. पिपंरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात (Pune) दोन ओमिक्रॉन व्हेरियंटचा (Omicron virus) रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या आता नऊ झाली आहे.
दिल्लीतही ओमिक्रॉनचा शिरकाव
दिल्लीत (Delhi) कोरोना विषाणूच्या (Corona virus) ओमिक्रॉन प्रकाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. लोकनायक जय प्रकाश (LNJP) रुग्णालयात दाखल असलेला हा 37 वर्षीय रुग्ण नुकताच तंझानियाहून परतला होता.
महाराष्ट्र रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता
टाईम्स ऑफ इंडियाच्या (Times Of India) वृत्तानुसार मुंबईसह महाराष्ट्रात प्रत्येकी 17 ओमिक्रॉन संशयित रुग्ण आहेत. ज्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले असून त्यांचे अहवाल येणे प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे येत्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra) ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.