कोरोंना विशेष

महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी… ओमायक्रॉन बाधितांची उचांकी नोंद; मराठवाड्यात दोन रुग्ण.

मुंबई दि.26 डिसेंबर – राज्यात ओमायक्रॉन ( Omicron) रुग्णवाढीचा वेग वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (National Institute of Virology) दिलेल्या अहवालानुसार राज्यात एकूण 31 नवे ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. यात मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये (Aurangabad) आढळलेल्या दोन बाधितांचा समावेश आहे.

(Worrying … The highest number of Omaicron infestations recorded in Maharashtra today; Two patients in Marathwada.)

या 31 रुग्णांपैकी 27 रुग्ण फक्त मुंबईत आढळून आले आहेत. पुणे ग्रामीण व अकोला ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईमध्ये एकूण ओमीक्रोन (Omicron) बाधितांची संख्या (राज्यात सर्वाधिक) 73 एवढी झाली आहे.

त्यापाठोपाठ पुणे (Pune) ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रातील ओमीक्रोन बाधितांची संख्या 22 वर पोहचली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 19 रुग्ण आहेत. सातारा जिल्हा व उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात ओमीक्रोन बाधितांची संख्या प्रत्येकी 5 वर पोहचली आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण 3 रुग्ण आहेत. कल्याण-डोंबिवली, नागपूर व औरंगाबाद शहरात प्रत्येकी 2 रुग्ण आहेत. बुलढाणा, लातूर (Latur), अहमदनगर, अकोला जिल्ह्यांसह वसई विरार, नवी मुंबई व मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात प्रत्येकी 1 रुग्ण ओमीक्रॉन बाधित आहे. मराठवाड्यात आता एकुण ओमायक्रॉन बाधितांची संख्या 8 झाली आहे.

राज्यातील नव्या 31 रुग्णांसह राज्याची ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णसंख्या 141 वर पोहचली आहे. आजवर 61 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ओमिक्रोन रुग्णसंख्या वाढत चालली असून याच पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. तसेच काही मार्गदर्शक (guidelines) सूचना जारी केल्या आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!