माझं गाव

धारुर तालुक्यात युवा कृषी व्यवसायिकाची आत्महत्या; आज झाले अंत्यसंस्कार.

किल्लेधारूर दि.23(वार्ताहर) धारुर (Dharur) तालुक्यातील देवदहिफळ येथील तरुण व दिंद्रुड येथे कृषी सेवा केंद्र चालवणारे व्यवसायिकाने काल दि.22 शनिवार रोजी सांयकाळी 5 च्या सुमारास गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली.

(Young agriculturist commits suicide in Dharur taluka; The funeral took place today.)

खंडू त्रिंबकराव पोटे (28) असे मयत युवकाचे नाव आहे. दिंद्रुड-मोहखेड रोडवरील एका झाडाला गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास उघडकीस आली. नातेवाईकाच्या माहिती वरुन दिंद्रुड पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

प्रेत उत्तरीय तपासणीसाठी शनिवारी रात्री अंबाजोगाई येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवले. आज रविवारी (दि.23) सकाळी शवविच्छेदनानंतर प्रेत नातलगांकडे अंत्यविधीसाठी सुपूर्द करण्यात आले. आत्महत्येचे कारण अद्याप पर्यंत समजले नाही, अधिक तपास दिंद्रुड पोलीस (Police) करत आहेत.

मयत तरुण हा मुळ राहणार रायगव्हाण ता. परतूर जि.जालना येथील असून हल्ली दिंद्रुड येथे परिवारासह स्थायिक होता. वडिलांच्या निधनानंतर देव दहिफळ येथे काका व मावशीकडे लहानपणापासून राहत होता. दिंद्रुड येथे पोलीस कॉलनी समोरील जय मल्हार कृषी सेवा केंद्र नावाने सदरील मयत युवकाचा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात आई (रा.रायगव्हाण), पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. त्याच्या निधनामुळे परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!