माझं गाव

धारुरमध्ये युवा व्यापाऱ्याची आत्महत्या; भर रस्त्यावरील दुकानातील घटनेने खळबळ..

किल्लेधारूर दि.23 जून – येथील युवा व्यापारी धनंजय शिरीष पिलाजी (वय 38) यांनी दुकानातच काही वेळा पुर्वी आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली असून रस्त्यावर बघ्यांनी गर्दी केली आहे. घटनास्थळी पोलीस (Police) दाखल झाले आहेत.

(Young businessman commits suicide in Dharur; Bhar committed suicide in a street shop.)

धारुर (Dharur) शहरातील मुख्य रस्त्यावर न्यू श्रीकांत जनरल व मोबाईल सेंटर या दुकानाचे मालक धनंजय पिलाजी यांनी आज दि.23 बुधवारी दुकानात आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. भर दुपारी हा प्रकार उघडकीस आल्याने लोकांनी गर्दी केली होती.

धनंजय पिलाजी यांचा अत्यंत चांगला स्वभाव असल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सतत हसतमुख असणाऱ्या धनंजय यांच्या आत्महत्येमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून आत्महत्येचे (Suicide) कारण स्पष्ट झालेले नाही.

पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाली असून गर्दी हटवण्याचे काम सुरु आहे. घटनेचा पंचनामा करुन पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून कळते. घटनास्थळी पोलिस निरिक्षक सुरेखा धस जातीने उपस्थित झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!