धारुर तालुक्यात तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या; सोमवारी सकाळी 10 ची घटना

किल्लेधारूर दि.8 मार्च – तालुक्यातील भोपा येथील तरुणाने आज दि.8 सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली. ग्रामस्थांनी पोलिसांना (Police) याबाबत माहिती दिली आहे.
(Young farmer commits suicide in Dharur taluka; Monday morning at 10 p.m.)
धारुर (Dharur) तालुक्यात मोठ्या प्रमाणात आत्महत्या सत्र सुरु आहे. काही दिवसांपुर्वी अंजनडोह येथे शेतकऱ्याने मंदिरात गळफास घेतल्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ आज भोपा येथील 24 वर्षीय तरुणाने शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना घडली. मयत तरुण हा अविवाहित असून युवराज गोविंद वांडरे असे मयताचे नाव आहे.
सकाळी 10 च्या सुमारास त्याने आपल्या शेताच्या शेजारी असलेल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. आत्महत्येचे (suicide) कारण अद्याप कळालेले नाही. ग्रामस्थांनी दिंद्रुड पोलिसांना (Police) याबाबत माहिती दिली आहे. गावातून मिळालेल्या माहितीनूसार सदरील तरुण कर्जबाजारी असल्याचे कळाले. सदरील तरुण हा शेतकरी असून त्याच्या पश्चात वडिल, आई, भाऊ असा परिवार आहे.